गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. मुंबईतील मोठ्या मोठ्या गणपतींच आगमन झाल्यात जमा आहे. मोठ्या जल्लोषात दरवर्षी बाप्पाच आगमन मुंबईत केलं जात. यावर्षी देखील मोठ्या गाजावाजात मुंबईतील बाप्पाचे आगमन पार पडले आहे. गणपती आगमनादरम्यान गणेश भक्तांची देखील मोठी गर्दी पाहायला मिळाली. काही दिवसातच गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. तर गणपती बाप्पाची मूर्ती सजवण्याचे काम देखील अंतिम टप्प्यात आले आहे.
तर अशातच आता मुंबईच्या राज्याचा दरबार सजतो आहे. मुंबईचा राजा म्हणून ज्याची ओळख आहे असा गणेश गल्लीचा राजा यंदा उज्जैन च्या महाकाल नगरीत दिसणार आहे, म्हणजेच यावर्षी उज्जैनच्या महाकाल मंदिराचा देखावा मंडळाकडून साकारण्यात येणार आहे. लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाकडून दरवर्षी वेगवेगळा देखावा साकारण्यात येत असतो. दरवर्षी तीर्थक्षेत्र, विविध पर्यटन स्थळ, हे गणेशोत्सवामध्ये साकारण्याचा प्रयत्न मंडळाचा असतो.
गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा 350वा राज्याभिषेक सोहळा साकारण्यात आला होता त्यानिमित्ताने रायगड उभारण्यात आलं होतं. यंदा उज्जैन च महाकाल मंदिर साकारण्यात येत आहे, त्यामुळे मंडळाच्या वतीने यावर्षी कशी तयारी असणार आणि काय खबरदारी घेण्यात येणार याकडे लक्ष लागलेलं आहे. तर यावर्षी हा भव्य देखावा पाहण्यासाठी लोकांची गर्दी कितीच्या संख्येत असणार आहे तसेच कोणत्या प्रकारचे व्यवस्थापन असणार आहे हे सुद्धा पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.